कावेरी.. तुझी की माझी?

(Above: Cauvery at Shivanasamudra Falls. Photo: Parineeta Dandekar)

मी २०१३ मध्ये कावेरीवरील धरणांचा अभ्यास करत कर्नाटक-तामिळनाडू सीमाप्रांतात आले होते. अत्यंत सुंदर नदीपात्र आणि वैविध्यपूर्ण जंगल. समोर शिवनासमुद्र धबधब्याचा अविस्मरणीय विस्तार. इथे कर्नाटकने अनेक छोटे जल विद्युत प्रकल्प बांधले आहेत. कावेरीला अनेक ठिकाणी कैद केले आहे. बंगलोरचा पाणीपुरवठा देखील या सीमेजवळूनच होतो. तेव्हा कर्नाटकचे या सीमेला अगदी बिलगुन ‘मेकेदाटू’ प्रकल्प बनवायचे मनसुबे सुरु होते. यात कावेरी अभयारण्याचा मोठा भाग बुडणार आहे. कर्नाटकच्या आणि तमिळनाडूच्या निसर्गप्रेमींसाठी जमेची बाब एकच.. ती म्हणजे तामिळनाडूचा कावेरी पाण्याबद्दलचा विलक्षण तिखट आवेश, जो १५० वर्षांच्या संघर्षाने अधिक तीक्ष्ण होत गेला आहे.  

कावेरी पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर रोजीच्या निकालाने कर्नाटक आणि तमिळनाडू दोन्हीकडे असंतोष आणि अराजक माजला आहे. अनेक सरकारी वाहनांचे दहन, तोडफोड, जाळपोळ कर्नाटकात तमिळ लोकांना आणि तमिळनाडूत कन्नडिगांना मारहाणही झाली. आज, म्हणजे २० सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय घोषित झाला .आत्ताच्या माहितीप्रमाणे  कर्नाटकला ६००० क्युसेक्स 2७ सप्टेंबर पर्यंत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जे अत्यंत आश्चर्यकारक आहे.   कर्नाटकात चोख पोलीस बंदोबस्त झाला आहे. सीमेवरील रस्त्यांना छावणीचे रूप आले आहे. कलम 144 लागू करण्यात आला आहे. Continue reading “कावेरी.. तुझी की माझी?”