SANDRP आणि प्रवाह बद्दल थोडे..

SANDRP म्हणजे South Asia Network on Dams, Rivers and People. भारतभरातील आणि दक्षिण आशियातील पाण्यासंबंधी, नदी संबंधी घटनांचा मागोवा आम्ही घेत असतो. हे काम गेली २० वर्षे सुरु आहे. आमचा इंग्रजी ब्लॉग आहे sandrp.wordpress.com

इथे मात्र महाराष्ट्रासंबंधी किंवा मराठीतील नोंदी आहेत. विविध ठिकाणी प्रकाशित झालेले साहित्य इथे एकत्रित केले आहे.

नुसते “पाण्याला” जोडून घेणे अवघड असते..पाणी तसे पाणी नसतेच..ते कुठल्यातरी परिसंस्थेचा: मग ती नदी असो, भूजल असो, खाडी असो, निर्झर असो, समुद्र असो, याचा भाग असते.

त्यामुळे इथे नुसते पाण्यासंबंधी प्रश्न नाहीत, तर नद्यांच्या गोष्टी, कविता, किस्से, थोडक्यात पाण्याचे आणि नद्यांचे आपल्या जगण्यातले अनेक रंग असतील, किंवा ते आणण्याचा मी प्रयत्न करीन 🙂

आपली मदत, सल्ले, नव्या कल्पना नक्की कळवा 🙂

धन्यवाद,

परिणीता दांडेकर (parineeta.dandekar@gmail.com)DSCN5010.JPG