गोदावरीचा उगम लहानपणी बघितला होता. ब्रह्मगिरीवर. इवलीशी धारा. तेव्हापण आश्चर्य आणि काहीसं disappointing वाटलं होतं. ही इतकुली नदीची सुरुवात?
पण नदीचा उगम एकटा नसतोच. कितीतरी धारा एकत्र येतात, दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या… एक प्रवाह बनतो. आपल्याकडे याचे फार अप्रूप. मग तिथे सुंदर शंकाराची मंदिर उभी राहतात, देवराई येते, कथा येतात. हा Sense of wonder किती महत्वाचा, नाही? आपल्याला हल्ली ती सोय नाही.
Burton आणि Speke ने म्हणे नाईलच्या उगमाचा शोध घेतला..१८५०s मध्ये त्यांचा प्रवास सुरु झाला..खुपसा पायी, कधी गाढवांवर..प्रवासात दोघेही आजारी पडले, त्यांच्यावर हल्ले झाले,स्पेक भयंकर जखमी झाला, त्याची दृष्टी जवळजवळ गेलीच..श्रेय खुपसे Burtonला मिळाले..त्यांचे टोकाचे भांडण झाले इत्यादी.. सगळे कुठे travel buddies असतात, काही बोटीला बांधलेले धीवर असतात.. पण गम्मत म्हणजे लेक विक्टोरिया जवळच्या आदिवास्यांना नाईलचा उगम माहित होताच..नुसता माहित नव्हता तर तो त्यांच्यासाठी पवित्र होता.

पण आपल्यासाठी मात्र नाईलच्या उगमाचा शोध Burton ने लावला. 🙂 तसेच अमाझोन चे. 18व्या शतकापासून तिच्या उगमाच्या खूप सुरस गोष्टी आहेत. अजूनही नव्याने शोध सुरू आहेत.
आपल्या भीमेचे गुप्त भिमाशंकर काय सुरेख आहे ना..किंवा कृष्णेचे पाषाणकाळे गारगार मंदिर..तिथे तर भूजल वर येते, त्यालाच उगम मानले आहे..जसे गंगेचा उगम म्हणजे बर्फाळ Glacier..
गंगेवर आपण जेव्हा तिच्या जन्मस्थळा जवळ ३३० धरणे बांधतो…किंवा अगदी छोटा भागीरथी Eco Sensitive Zone देखील जलविद्युत प्रकल्पांसाठी मोडीत काढतो.. तेव्हा ते नदीलाच मारण्यासारखे असते…. उगमाजवळ नदी खूप काही वहावत नेते..गंगेचे सुपीक खोरे बनले आहे ते हिमालयातील दगडातून..
तिबेटचे बर्फाळ पठार म्हणजे जगाचे छप्पर. किती नद्या तिथे जन्म घेतात..ब्रह्मपुत्र, सिंधू, सतलुज, घागरा, राक्षसताल आणि मानसरोवराला जोडणारी छोटी गंगा 🙂
तुला माहितीये, Alice जेव्हा सिंधूच्या उगमाच्या शोधात गेली तेव्हा तिचा प्रवास चीन मधल्या एका धरणापाशी येऊन थिजला..

असो. मुद्दा असा आहे की…मुद्दा नाहीच 🙂
नदीचा जन्म कसा होतो? कुठून होतो? कुठे म्हण्यायचे की ok, ही आता नदी…संध्याकाळ कधी होते नक्की? केव्हा संपते?
धारा की थेंब की ढग की वाफ की समुद्र की सूर्य?.. बारका देव..God of small things…मोठ्या देवांसमोर पळून जाणारा..”Big God howled like a hot wind, and demanded obeisance. Then Small God (cozy and contained, private and limited) came away cauterized, laughing numbly at his own temerity.”
छोटी ओंजळ सुंदर असते..एका थेंबात अख्ख्या नदीचेच का समुद्राचे गीत असते..है ना?
मला इतकेच कळते की ८.४ चे ८ झाले आणि उद्या ७ होईल.
~परिणीता