नावं

Above: खलघाट येथील नर्मदा फोटो: परिणीता

मुझे जाँ न कहो मेरी जाँ, मेरी जाँ..
जाँ न कहो अंजान मुझे,
जान कहाँ रहती है सदा..

संजीव कुमार काय सही होता ना यात.. आणि गीता दत्त..तिच्यासाठीच होत हे गाणं.. actually you know what जान वगैरे राहू दे, एका नदीचे नावपण एक राहत नाहीत..बदलत जातं..

दगडांवरून खळखळ उड्या मारते ती ‘रेवा’,
गंभीर, घरंदाज, मागे न वळणारी ती ‘नर्मदा’.

जिला बांधता येत नाही ती ‘गंगा’.
खाली मान घालून सगळ्यांचं सगळं ऐकते ती ‘जान्हवी’…
परदेशी जाते तेव्हा सुलक्षणी ‘पद्मा’..
समुद्रात विलीन होताना ढगांकडे बघणारी ‘मेघना’.

आपल्या पुस्तकी fantasy साठी ‘सिंधू’,
सिंधच्या लोकांना पुरांनी हैराण करते ती ‘पुराली’,
अफगाण्यांना जबाबदार वडील वाटते तेव्हा ‘अब्बासिन’,
कधी आकाशाचा तुकडा चोरते तेव्हा ‘निलाब’

तापत-तळपत, विदर्भ-खानदेशातून जाते ती ‘तापी’,
डोकं उशाशी घेऊन आश्वस्त करते ती ‘अर्कजा’.

शक्तीस्वरूप वाहते ती ‘भीमा’,
विठ्ठलाच्या पायी उगीच रेंगाळते ती ‘चंद्रभागा’.

गंगेची १००० नावे, नर्मदेची १०००, तापीची २१.

सांगायचं काय (अरे किती बोलते ही :D) की खूप नावं पाहिजेत…अगदी खूप. एका माणसाला एकच नाव जन्मभर कसं पुरणार? किती माणसं असतात एकात. गर्दी असते. रात्री लिहिणारी वेगळी. सकाळी वाचणारी वेगळी. भंकस करणारी माणसं वेगळी, फिलोसोफीवाली वेगळी. चर्चसमोर पाणीपुरी खाणारी वेगळी, डॉक्टर बनणारी वेगळी.

तुला लहानपणी एकच नाव होते हे मला म्हणून आवडत नाही.

~परिणीता

तापी, तापिणी, तप्ती..

Above: तापी-पूर्णेची उपनदी सपन. फोटो: परिणीता

अर्कजा, सत्या, शामा, कपिला, सर्पा, तारा, ताम्रा, सूक्ष्मा, सहस्राकारा…कोण आहेत या सगळ्या?

आपण जसे लहानग्यास अनेक नावांनी हाक मारतो, तशी ही आहेत तापी माहात्म्या मधील तापी नदीची काही नावे .. तिचा वाढदिवस देखील असतो आषाढ शुद्ध सप्तमीला 🙂 Continue reading “तापी, तापिणी, तप्ती..”