उत्सव कशाकशाचे असतात… झाडांना पाने फुटण्याचा उत्सव, फुले येण्याचा..फळे धरण्याचा उत्सव… रोपे अंकुरण्याचा, पिके उन्हात सोनेरी होण्याचा उत्सव…
पुराचा उत्सव….पूर ओसरण्याचा उत्सव.. इजिप्त मध्ये अजूनही वफा-अल-नील साजरा होतो..कशाचा माहितीये? नाईलला (तांबे सर म्हणतात नील म्हण 🙂 पूर येण्याचा उत्सव! नाईलचा पूर म्हणजे High Aswan धरण पूर्ण
होण्याआधी इजिप्तसाठी lotteryच ना..भरमसाठ पाणी आणि भरमसाठ श्रीमंत गाळ..सोन्यासारखा गाळ…शेते फुलवणारा..सोने का है मोल सोणिया, मिट्टी है अनमोल सोणिया, etc etc .. त्या वाळवंटातल्या लोकांना दूर डोंगरात पडणारा पाऊस कळायचाच नाही…पण नाईल अचानक पाण्याने फुलायची…मग कथा आणि उत्सव त्या भोवती गुंफले जाणारच..

आता आपल्याला गाळ आणि पूर दोन्ही नको..पाणी पाहिजे, नदी वगैरे झंजट नको.
पण पुराचे चिवट उत्सव अजून तशेच टिकून आहेत बिहारमध्ये..आपण तसे बेरकी. रामकुंडात डुबक्या मारतो..बोरवेलच्या पाण्यात 🙂
सिंधमध्ये, सिंधू नदीच्या विस्तीर्ण मुखाजवळ पूर आल्यालावर एक उत्सव असायचा आणि पूर ओसरल्यावर परत एक! सही ना.. तसे सिंधी लोक मला आवडतात. त्यांचे सिंधुशी खूप घट्ट नाते, हिल्सा माशावर बसणारा पांढरा दाढीवाला सिंधू देव त्यांचा बॉस.. आणि अजूनही एखण तिज, चेटी चंद, चालिहो हे सगळे नदीशी जोडलेले उत्सव..
and you know what..नद्यांचे पण Happy Birthday असतात.. (of course आपण ठरवलेले)

झेलमचा भाद्रपदात, गंगेचा जेष्ठात, तापीचा आषाढ शुद्ध सप्तमीला, गोदावरीचा माघात..नर्मदेचापण माघातच झाला काही दिवसांपूर्वी.. and the best part is तेव्हा अमरकंटकच्या मंदिरात actually फुगे लावले होते..can you beat that?! 🙂
कृष्णेचे तर किती उत्सव..कृष्णामाईपासून कराड, औदुंबर, संगम माहुली, कोटेश्वर , सगळीकडे वेगळे वेगळे. तुळा संक्रांतीला कावेरीचा जन्मोत्सव..
कसली &*&*गिरी ना..नद्यांचे कसले कपाळ वाढदिवस..नर्मदा बघ किती अशक्य जुनी नदी..माणूस पृथीवर सरळ चालायला शिकला नव्हता तेव्हा पासून ती वाह्तीये आणि आपण गेल्यावर देखील वाहणार आनंदाने…आणि आपण तिला Happy Birthday करुन फुगे लावणार 😀
पण बर असतं हेपण. नद्या खूप जुन्या आहेत, आपल्या पेक्षा कितीत्तरी म्हाताऱ्या म्हणून काही त्यांचा जन्मोत्सव करायचा नाही असे थोडेच आहे? हे सगळे आपल्यासाठी.आता हेच बघ ना…तवांग मध्ये Nyamjangchhu नदी काठचा उत्सव तारखेला धरून नाही..जेव्हा दुर्मिळ क्रौंच तिच्या तीरावर विणीच्या हंगामात हलकेच उतरतात तेव्हा party starts 🙂
नाजूक पक्षी हक्काने तीरावर उतरले की..किंवा कोणीतरी ओळखीचे खूप दिवसांनी गेटपाशी आले की झाला उत्सव..साजरा करा किंवा न करा…मला तर दोन-दोन दिवस मिळाले 🙂 पण नो फुगा 😐
~परिणीता