सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या नद्यांचे माहेरघर आहेत. येथून दोन प्रकारच्या नद्या उगम पावतात: दक्षिण वाहिनी: ज्या विस्तीर्ण, महराष्ट्रापल्याड जाणार्या आहेत, आणि पश्चिम वाहिनी नद्या, ज्या तशा छोट्या, सुबक आणि ओघवत्या आहेत. मोठ्या दक्षिणवाहिनी नद्यांमध्ये आहेत गोदावरी (आमची नदी, मी नाशिकची.), भीमा, कृष्णा आणि कोयना. पश्चिमवाहिनी नद्या अनेक आहेत, जसे की दमणगंगा (गुजरातेत जाणारी, कदाचीत नदीजोड प्रकल्पात भरडून निघणारी), काळू ,शाई (यांवर मुंबईसाठी मोठी धरणे नियोजित आहेत) उल्हास, वैतरणा (मुंबईला पाणीपुरवठा करणार्या), सावित्री (महाडचे रासायनिक प्रदूषण रीचवणारी), वशिष्ठी, (कोयनेचे/दुष्काळी भागाचे पाणी न मागताच आपल्या ओटीत सामावणारी, व नंतर लोटे परशुरामच्या रासायनिक प्रदूषणाने आपले मासे, जीवसृष्टी गमावणारी) शास्त्री (महराष्ट्रातील कदाचित एकमेव मुक्तवाहिनी नदी!), कर्ली (तळकोकणातला हिरा!) इत्यादी. Continue reading “छोटी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मोठ्या नद्यांची”
Category: नदी आणि संस्कृती
तुझे नाव काय गं सये?
बियास आणि सतलज या नद्यांमधला ‘दोआब’ हा भाग अत्यंत सुपीक आणि सुंदर. मी नद्यांचा अभ्यास करते. त्यादिवशी मी नद्यांवरील परिवहन प्रकल्पाबद्दल वाचत होते. त्यात या नद्यांवरील प्रकल्पाचा होणारा पर्यावरणीय परिणाम अभ्यासाला गेला होता. वा, परिवहन प्रकल्पांचा वेगळा EIA (Environmental Impact Assessment) ? नवीन आणि चांगली गोष्ट आहे की, हे कधी झाले, मी मनात म्हटले. या अभ्यासाचे मुख्य कार्यालय हाँगकाँग असणार आहे.
हाँगकाँग? मी परत वाचले. बियास आणि सतलजचा अभ्यास हाँगकाँगमध्ये बसून करणार? काहीतरीच.
पण काहीतरी चुकलेच होते. नकाशावरील नद्या अगदी नाजूक, छोट्याश्या दिसत होत्या. आपल्या पंजाबच्या बियास आणि सतलज या खानदानी नद्या. विस्तीर्ण गाळाची पात्रे, सुरेख तट. संस्कृती घडविणा-या या नद्या पंजाबमध्ये इतक्या नाजूक नक्कीच नाहीत. परत नीट बघितले. मी वाचत असलेला अहवाल हाँगकाँग सरकारचा होता आणि या सतलज, बियास अणि हो, झेलमसुद्धा! या नद्या भारतातील नाही, तर हाँगकाँगमधील होत्या! Continue reading “तुझे नाव काय गं सये?”