मुक्तवाहिनी शास्त्री: नदीपणाचे विद्यापीठ

“नदी”, “गंगा”, “सरिता”…या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे प्रवाह. वाहणे. वाहणे हा नदीचा धर्म, प्रवाह म्हणजे तिचा आत्मा. आज जेव्हा आपण आपल्या नद्यांची दैना बघतो, तेव्हा लागलीच कोणते शब्द आपल्या समोर येतात? प्रदूषण, अतिक्रमण, कचरा, दुष्काळ, पूर…

नदी वाहती नसणे हे आपण खूप सहज मान्य केले आहे का?

मग याला आपण खूप कारणे दिली..अगदी आमच्याकडच्या नद्या कधीच बारमाही नव्हत्याच मुळी, त्या कोरड्याच होत्या हा तर्क आपण ओढून ओढून थेट पावसाळ्यात पण सांगायला मागे पुढे बघितले नाही. शासनदरबारी कोरडी नदी इतकी सोयीस्कररित्या “सरकारमान्य” होवून बसली की कृष्ण पाणी तंटा लवादात महाराष्ट्राने सांगितले कृष्णा आमच्याकडे बारमाही कधीच वाहत नाही. यावर लवादाने आपल्याला अभ्यासपूर्ण रित्या फटकारले हे सांगायला नको. Continue reading “मुक्तवाहिनी शास्त्री: नदीपणाचे विद्यापीठ”

तापी, तापिणी, तप्ती..

Above: तापी-पूर्णेची उपनदी सपन. फोटो: परिणीता

अर्कजा, सत्या, शामा, कपिला, सर्पा, तारा, ताम्रा, सूक्ष्मा, सहस्राकारा…कोण आहेत या सगळ्या?

आपण जसे लहानग्यास अनेक नावांनी हाक मारतो, तशी ही आहेत तापी माहात्म्या मधील तापी नदीची काही नावे .. तिचा वाढदिवस देखील असतो आषाढ शुद्ध सप्तमीला 🙂 Continue reading “तापी, तापिणी, तप्ती..”

कावेरी.. तुझी की माझी?

(Above: Cauvery at Shivanasamudra Falls. Photo: Parineeta Dandekar)

मी २०१३ मध्ये कावेरीवरील धरणांचा अभ्यास करत कर्नाटक-तामिळनाडू सीमाप्रांतात आले होते. अत्यंत सुंदर नदीपात्र आणि वैविध्यपूर्ण जंगल. समोर शिवनासमुद्र धबधब्याचा अविस्मरणीय विस्तार. इथे कर्नाटकने अनेक छोटे जल विद्युत प्रकल्प बांधले आहेत. कावेरीला अनेक ठिकाणी कैद केले आहे. बंगलोरचा पाणीपुरवठा देखील या सीमेजवळूनच होतो. तेव्हा कर्नाटकचे या सीमेला अगदी बिलगुन ‘मेकेदाटू’ प्रकल्प बनवायचे मनसुबे सुरु होते. यात कावेरी अभयारण्याचा मोठा भाग बुडणार आहे. कर्नाटकच्या आणि तमिळनाडूच्या निसर्गप्रेमींसाठी जमेची बाब एकच.. ती म्हणजे तामिळनाडूचा कावेरी पाण्याबद्दलचा विलक्षण तिखट आवेश, जो १५० वर्षांच्या संघर्षाने अधिक तीक्ष्ण होत गेला आहे.  

कावेरी पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर रोजीच्या निकालाने कर्नाटक आणि तमिळनाडू दोन्हीकडे असंतोष आणि अराजक माजला आहे. अनेक सरकारी वाहनांचे दहन, तोडफोड, जाळपोळ कर्नाटकात तमिळ लोकांना आणि तमिळनाडूत कन्नडिगांना मारहाणही झाली. आज, म्हणजे २० सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय घोषित झाला .आत्ताच्या माहितीप्रमाणे  कर्नाटकला ६००० क्युसेक्स 2७ सप्टेंबर पर्यंत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जे अत्यंत आश्चर्यकारक आहे.   कर्नाटकात चोख पोलीस बंदोबस्त झाला आहे. सीमेवरील रस्त्यांना छावणीचे रूप आले आहे. कलम 144 लागू करण्यात आला आहे. Continue reading “कावेरी.. तुझी की माझी?”

छोटी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मोठ्या नद्यांची

सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या नद्यांचे माहेरघर आहेत. येथून दोन प्रकारच्या नद्या उगम पावतात: दक्षिण वाहिनी: ज्या विस्तीर्ण, महराष्ट्रापल्याड जाणार्या आहेत, आणि पश्चिम वाहिनी नद्या, ज्या तशा छोट्या, सुबक आणि ओघवत्या आहेत. मोठ्या दक्षिणवाहिनी नद्यांमध्ये आहेत गोदावरी (आमची नदी, मी नाशिकची.), भीमा, कृष्णा आणि कोयना. पश्चिमवाहिनी नद्या अनेक आहेत, जसे की दमणगंगा (गुजरातेत जाणारी, कदाचीत नदीजोड प्रकल्पात भरडून निघणारी), काळू ,शाई (यांवर मुंबईसाठी मोठी धरणे नियोजित आहेत) उल्हास, वैतरणा (मुंबईला पाणीपुरवठा करणार्या), सावित्री (महाडचे रासायनिक प्रदूषण रीचवणारी), वशिष्ठी, (कोयनेचे/दुष्काळी भागाचे पाणी न मागताच आपल्या ओटीत सामावणारी, व नंतर लोटे परशुरामच्या रासायनिक प्रदूषणाने आपले मासे, जीवसृष्टी गमावणारी) शास्त्री (महराष्ट्रातील कदाचित एकमेव मुक्तवाहिनी नदी!), कर्ली (तळकोकणातला हिरा!) इत्यादी. Continue reading “छोटी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मोठ्या नद्यांची”

तुझे नाव काय गं सये?

बियास आणि सतलज या नद्यांमधला ‘दोआब’ हा भाग अत्यंत सुपीक आणि सुंदर. मी नद्यांचा अभ्यास करते. त्यादिवशी मी नद्यांवरील परिवहन प्रकल्पाबद्दल वाचत होते. त्यात या नद्यांवरील प्रकल्पाचा होणारा पर्यावरणीय परिणाम अभ्यासाला गेला होता. वा, परिवहन प्रकल्पांचा वेगळा EIA (Environmental Impact Assessment) ? नवीन आणि चांगली गोष्ट आहे की, हे कधी झाले, मी मनात म्हटले. या अभ्यासाचे मुख्य कार्यालय हाँगकाँग असणार आहे.

हाँगकाँग? मी परत वाचले. बियास आणि सतलजचा अभ्यास हाँगकाँगमध्ये बसून करणार? काहीतरीच.

पण काहीतरी चुकलेच होते. नकाशावरील नद्या अगदी नाजूक, छोट्याश्या दिसत होत्या. आपल्या पंजाबच्या बियास आणि सतलज या खानदानी नद्या. विस्तीर्ण गाळाची पात्रे, सुरेख तट. संस्कृती घडविणा-या या नद्या पंजाबमध्ये इतक्या नाजूक नक्कीच नाहीत. परत नीट बघितले. मी वाचत असलेला अहवाल हाँगकाँग सरकारचा होता आणि या सतलज, बियास अणि हो, झेलमसुद्धा! या नद्या भारतातील नाही, तर हाँगकाँगमधील होत्या! Continue reading “तुझे नाव काय गं सये?”