राधा~यमुना

साहिरने कहर केला आहे तो ‘ना तो कारवां की तलाश है’ मध्ये. मी ते गाणे अनेक अनेक अनेक वेळा ऐकले असीन. नेहमी नवे काहीतरी हाती येते. अस्सल कलाकृती सारखे.

त्यातली एक ओळ म्हणजे ‘बहुत कठिन है डगर पनघट की..अब क्या भर लाऊ मै जमना से मटकी’..Somehow हे इतके आवडते की काही reports मध्ये पण घुसडवले आहे :p

सांगायची गोष्ट अशी की कारवां मधल्या या lines खुसरोच्या आहेत…”मेरे अच्छे निझाम पिया, बहुत कठिन है डगर पनघट की..अब क्या भर लाऊ मै मधवा से मटकी”…इथे कृष्ण नाही तर सूफी संत निजामुद्दीन औलिया आहे 🙂

साहिरने मात्र कारवामध्ये त्याचे ‘नंदकिशोर’ केले आहे.. (त्यात कोण नाही? 🙂

शाम, राधा आणि नदी हे समीकरणच आहे. इतके की शेवटी राधा वैतागुन म्हणते “नदी नारे न जाओ शाम, पैय्या पडू” ( का, तर तो पलिकडे जाऊन सौतन आणेल म्हणून. deep rooted राधा insecurities 😉 )

तेरा श्याम बड़ा अलबेला, मेरी मटकी में मार गयो डेला
कभी गंगा के तीर, कभी यमुना के तीर.. कभी नदियन नहाये अकेला

हे रंग खूप आनंदी आहेत.. वैतागलेले, त्रासिक, चहाडीखोर, भांडखोर..पण आनंदी.

मग यमुनातीराचे parochial जग सोडून शाम “greener pastures” कडे जातो. तेव्हा कविकल्पना वगैरे ठीक, पण खरा वाटतो तो कबीराचा दोहा, अबिदाच्या आवाजात..

‘भला हुआ मोरी मटकी फुटी, मै पनिया भरन से छूटी रे’..

बरंच झालं. घागर नको, यमुना नको, शाम नको. काहीच नको. कृष्ण द्वारकेला, गोमती तीरी जाताना राधेने म्हटले असेल कदाचित.

फार pessimistic झाले का? मग इथे आपले गुलझार आणि रितुपर्णो (<3 you) म्हणतात कृष्ण गेला होता मथुरेहून परत एकदा..

मनोहर वेश छोड़ नन्द राज
सर से उतारके सुन्दर ताज
फिर काहे बांसुरी बजाओ?
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ?

धीरे धीरे पहुचात जमुना के तीर
सुनसान पनघट मृदुल समीर
उसे काहे भूल ना पाओ
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ

ही खरी कविकल्पना 🙂

~ परिणीता 

One thought on “राधा~यमुना

  1. परिणीता …
    किती गोष्टीवेल्हाळ नदीकथा ! अनेकदा वाचल्या. तहानच भागत नाही. जादू आहे शब्दांची , पण तितकीच सच्ची. फार आनंद दिलास !
    तुला भेटायला नदीसारखं धावत यावंसं वाटतं प्रत्येक गोष्ट वाचताना.
    लिहीत रहा. वाट बघतो आम्ही सगळेच नव- नव्या अविष्कारांची !
    स्वाती

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s